निरा नरसिंहपुर येथील आदर्श गुरुजी कै. पांडुरंग अच्युतराव वांकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

निरा नरसिंहपुर दिनांक 2 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील  कै.पांडुरंग अच्युतराव वांकर यांचे नरसिंह पूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 94 होते. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली एक मुलगा सून दोन नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कामाची जबाबदारी विद्यार्थ्यांन सोबत बजावली होती.

लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे विश्वस्त,व चैतन्य विद्यालयाचे कार्याध्यक्ष, निरा नरसिंहपुर गावचे  पोलिस पाटील आभयकुमार वांकर यांचे ते वडील होते

पांडुरंग वांकर गुरुजींच्या आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना.

————————————————————-

फोटो:- कै. पांडुरंग अच्युतराव वांकर