नेट परीक्षेत स्वाती आढे यांचे सुयश

धानोरा/भाविकदास करमनकर
स्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सत्र २०१८-१९ मध्ये समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असून नुकत्याच झालेल्या ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे.
स्वाती प्रकाशजी आढे (मुरकुटे) महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनी असून नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व प्राचर्य व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आणि आप्तस्वकीयांनी अभिनंदन केले आहे.