रेती ट्रॅक्टर चालकाचा मुत्युदेह रात्री घरी आणुन टाकला  अवैध रेती चोरीत घातपाताची शक्यता असल्याची जोरात चर्चा. ?

 

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

कन्हान : – पेंच नदीच्या बखारी, वाघोडा, घाटरोहना रेती घाटातुन अवैध रेती चोरी प्रकरणातील ट्रॅक्टर चालक झामा नितनवरे याचा मुत्युदेह मंगळवारी रात्री दिड वाजता चारचाकी वाहनात आणुन बोरडा येथे घरी आणुन टाकुन ट्रॅक्टर वरून पडल्याचे सांगुन चार लोक निघुन गेल्याने मुत्युदेह असल्याचे लक्षात आल्याने कन्हान पोलीसाना माहीत देत तक्रार केली.
कन्हान परिसरात अवैध रेती चोरीस चांगलाच ऊत येत असुन मंगळवार (दि.१) डिसेंबर ला मध्यरात्री १.३० वाजता ट्रॅक्टर मालक, इतर तीन लोकांनी चार चाकी वाहनात ट्रॅक्टर चालक बोरडा येथील आजोबा बळीराम मानवटकर कडे राहण्या-या प्रदीप उर्फ झामा रोशन नितनवरे वय २६ वर्ष याचा मुत्युदेह घराच्या आत टाकुन ट्रॅक्टर वरून पडल्याचे सांगुन निघुन गेले. काही वेळाने झामाची काहीच हालचाल होत नसल्याने घरच्यानी आजुबाजुच्याना बोलावुन बहितले तर मुत असल्याचे लक्षात आल्याने माजी पोलीस पाटीलाना बोलावुन कन्हान पोलीसाना माहीती दिल्याने सकाळी पहाटे ५ वाजता पोलीस पोहचुन घरच्या व ग्रामस्थानी अवैध रेती चोरीतुन घातपाताची चर्चा असल्याने ट्रॅक्टर मालकास बोलावुन झामा नितनवरे चा मुत्युदेह श्वविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.