प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तालुक्यातील शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा.(प्रचार प्रसिद्धी साठी रथ यात्रे चा शुभारंभ)

228

कुरखेडा-राकेश चव्हाण प्र कुरखेडा

तालुक्यामध्ये खरीप हंगामात धान हे मुख्य पीक असून जास्तीतजास्त शेतकरी धानाची शेती करतात.सन २०२०-२१ मध्ये केंद्र सरकारने प्रधान मंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून त्या योजने अंतर्गत धान पीक ही समाविष्ट करण्यात आले त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती,कीड,व आकल्पित प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा सरंक्षण देणे,नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य अबाधित ठेवणे हा मुख्य उद्देश असून या योजनेचा जास्तीत जास्त कर्जदार व बिगर कर्जदार गटातील शेतकरी बांधवानि लाभ घ्यावा असे आव्हान तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार चित्र रथाचे उद्घाटन प्रसंगी तहसीलदार सोमनाथ माळी यांनी आव्हान केले या प्रसंगी श्रीमती तेलंग बी डी ओ मॅडम,कु सुरभी बाविस्कर तालुका कृषि अधिकारी, विजय गायकवाड कृषी अधिकारी, संजय रामटेके मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. या योजनेत लाभ घेण्यासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे