जिल्ह्यात 5 वर्षात 1 हजारांहून अधिक महिला बेपत्ता

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : महिला, तरुणींवर अत्याचार होणाच्या गंभीर घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालात हे नमुद करण्यात आले आहे. याच महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल 1 हजार 309 महिला, तरूणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यापैकी 144 महिला अजूनही गायब आहेत. जिल्हा पोलिस दलाकडुन ही अधिकृत माहिती पुढे आली आहे. बेपत्ता झालेल्या महिलांपैकी बहुसंख्य महिला ह्या विवाहित आहेत.
सदरची माहिती पुढे आल्यावर खळबळ उडाली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील महिलांचे बेपत्ता होण्याची संख्या व तक्रार नोंदवली गेल्यावर पोलिसांना महिलांना शोधून काढण्यात किती यश आले ही आकडेवारी पाहता समाधानकारक नसून याबात विशेष महत्त्व देत याविषयावर पाठपुरावा होणे व यासाठी विशेष मोहिम हाती घेणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.

दखल न्यूज भारत