माहोली धांडे येथे पिक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
तालुक्यातील माहोली धांडे येथे दि 1 डिसेंबर रोजी अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे गजानन कातखेडे यांच्या शेतात पिक पाहणी कार्यक्रम आणि तुर, हरभरा या पिकावरील किड रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीतर्फ प्रतिनिधी गौरव सगणे,प्रतिक नळकांडे यांनी केले होते तर प्रमुख मार्गदर्शन कंपनीचे व्यवस्थापक अधिकारी यांनी केले यावेळी शिवसेना दर्यापूर उपतालुका प्रमुख गणेश साखरे यांचासह गावातील शेतकरी उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्वांनी मास्क लाऊन व सोशल डिस्टंटिंगचे पालन केले होते