देविपुर गावाजवळ असलेल्या उंच पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करा परिसरातील जनतेची मागणी.

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा :- आरमोरी तालुक्यातील वडधा – देशपुर मार्गावरील देवीपुर नाल्यावर असलेल्या पुलावर मोठे मोठे भगदाड पडले असल्यामुळे पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वडधा- देशपूर मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलावर काही वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.
या पूलास जवळपास वीस ते बावीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाला . पुलाच्या देखभाल दुरुस्तीअभावी फुलास मोठे मोठे भगदाड पडले आहेत. पुलाच्या सलाखी बाहेर निघाले असल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाने प्रति रोष व्यक्त केल्या जात आहे.
तरी या गंभीर बाबीची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन देविपुर लगत असलेल्या उंच पुलावरील मोडकळीस आलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे अशी परिसरातील जनतेने मागणी केली आहे.