परतवाडा येथील T T R होंडा शोरुमच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
परतवाडा येथील T T R होंडा शोरुमचा मनमानी कारभार चालला असुन या मनमानी कारभाराचा ग्राहकांना त्रास होत आहे
अमरावती रोडवर परतवाडा येथे T T R होंडाचे शोरुम आहे या शोरुममधून होंडा गाड्यांची विक्री केल्या जाते विक्री केलेल्या गाड्यांची सर्व्हिसिंग केल्या जाते या शोरुममधून एकदा का ग्राहकांना गाडी विकली कि सर्व्हिसिंग करतेवेळी ग्राहकांना त्रास होतो मात्र ग्राहकांना होत असलेल्या त्रासाशी शोरुममधील काम करण्याऱ्या कर्मचारीवर्गाला काहीही देणेघेणे नाही ते आपल्या मर्जीप्रमाणे वागत असल्याचा अनुभव परतवाडा शहरातील एका ग्राहकास आला
परतवाडा शहरातील श्री अशोक सावरकर यांनी या शोरुम मधून एक वर्षा आधी होंडा स्कुटी गाडी विकत घेतली होती त्या गाडीची सर्व्हिसिंग करायची असल्याने श्री अशोक सावरकर हे आज सकाळी 9 वाजता T T R होंडा शोरुम मध्ये गेले मात्र शोरुम बंद होते शोरुम मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाट पाहता पाहता बराच वेळ निघूनही एकही कर्मचारी शोरुम मध्ये हजर नव्हता
स्वागत कशावर एक व्यक्ती हजर होता त्यास श्री अशोक सावरकर यांनी विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली सावरकर यांनी त्यास काम करणारे कर्मचारी व शोरूम मालक यांचे मोबाइल नंबर मागितले असता माझ्याकडे कुणाचेच नंबर नाहीत असे सांगुन आपल्या बेजबाबदारी दाखवून दिली
एकीकडे शोरुममध्ये कर्मचारी वेळेवर येत नाहीत तेच दुसरीकडे गाडी फायनान्स करणारे शोरुममध्ये सकाळीच हजर होते
ग्राहकांना गाडी विकत घ्यायची असेल तर शोरुम मधील कर्मचारी त्यांची आवभगत करतात आणि एकदा का ग्राहकांना गाडी विकली कि मग ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे या शोरुम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे लक्षच राहत नाही याचा अनुभव बऱ्याच ग्राहकांना आला आहे हे शोरुम अमरावती येथील एका व्यक्तीच्या मालकीचे असून ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल शोरुम मालकाने लक्ष देणे गरजेचे आहे