शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
उपसंपादक- ९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही पोलिस स्टेशनचे हद्दीतील पुर्वेस ९ कि. मी.अंतरावर असलेले आदिवासी बहुल व जंगलव्याप्त गांव मुरपार (तु.) येथील देवराव तुकाराम कुमरे याचा मुलगा बंडू देवराव कुमरे वय ३१ वर्षे याचा विवाह जिवनापूर ता. नागभिड येथील घनशाम कुळमेथे यांची मुलगी* *भारती हिचेशी दिनांक- २६ एप्रिल २०२६ रोजी रितीरिवाजानूसार संपन्न झाला. त्यांना श्रेयशी नावाची २ वर्षाची मुलगी सुद्धा असल्याचे कळते. बंडूला दारूचे व्यसन असल्याने पती- पत्नीमद्धे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण व्हायचे. अशातच दिनांक- २६/११/२०२० ला सायंकाळी ७-०० दरम्यान दोघात भांडण झाल्याने पतीचे नेहमीचे त्रासाला कंटाळून, रागाचे भरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. त्यात तिचा उजवा हात बऱ्याच प्रमाणात जळालेल्या अवस्थेत आहे. सदर घटणेची तक्रार सिंदेवाही पो. स्टे. ला दिली.
तक्रारीची दखल घेत सिंदेवाही पोलिसांनी अ. प.क्र.- ५३३/२०२० नुसार आरोपीवर कलम ४९८ (अ) ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अजूनतरी अटक झाली नसल्याचे पोलिस सुत्राद्वारे कळले. गुन्ह्याचा पुढील तपास ए. पी. आय. योगेश घारे-ठाणेदार सिंदेवाही यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. गोपीचंद नेरकर हे करीत आहेत.