नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वैरागड :- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील नागरिकांकडे नळ आहेत . परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे नळातून पाणी बाहेर जाऊन ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जात आहे . त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.

शासनाकडून वारंवार पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा योग्य वापर करा , अशा वारंवार सूचना देण्यात येत असतात.
तरीही काही लोक जाणीवपूर्वक या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असतात.
वैरागड येथे सार्वजनिक नळ योजना आहे. तसेच घरगुती नळ योजना आहे . घरगुती नळ योजनेत अनेक नागरिकांच्या घरी नळ आहेत . परंतु त्यांच्या नळांना तोट्या लावलेल्या नाही. त्यामुळे पाणी ओव्हर फ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे. अशी मागणी होत आहे.