महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी संघटनेकडून लांजा येथील संकटग्रस्त निराधार कुटूंबाला आर्थिक मदतीचा आधार

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा, ता.लांजा, भांबेड गावातील दारीद्ररेषेखाली जीवन जगणारे बांधव कै. संजय लांबोरे यांचे सर्पदंशाने दिनांक 29/10/2020 रोजी अकस्मित निधन झाल्याने त्यांच्या निराधार कुटूंबाला आधार देण्यासाठी संघटनेच्या वतीने समाज बांधवांना आर्थिक मदत करण्याचे जाहिर आवाहन सोशल मिडिया व वृत्तपत्र माध्यमातून जाहीर करण्यात आले होते. संघटनेच्या विनंतीला प्रतिसाद देऊन एकूण 87 सज्जन दानशूर विविध समाजातील बंधू/भगिनी यांनी आर्थिक सहकार्याचा हात देऊन निराधार लांबोरे परिवाराला मदत केली. 87 व्यक्तींकडून जमा झालेली देणगी एकूण रुपये 28000/- (रूपये अठ्ठावीस हजार ) संघटनेच्या शिष्टमंडळाने दिनांक 30/11/2020 रोजी स्वतः लांजा येथील कै.संजय लांबोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या निराधार परीवाराची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराणी अहिल्यादेवी समाज परिवाराकडून जमा झालेली देणगी रुपये 28000/- रोख स्वरूपात दिले आहेत. महाराणी आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी सोशलमिडीया व वृत्तपत्र माध्यमातून लांबोरे परीवाराला मदत करण्याच्या केलेल्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देऊन संकटग्रस्त निराधार लांबोरे परीवाराला मदत करण्यासाठी विविध सामाजिक/ राजकीय संघटना पुढे येत असुन काही संघटनांनी प्रत्यक्ष लांबोरे परीवाराला मदतही केली आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी संघटनेचे शिष्टमंडळ संघटनेच्या कर्मचारी शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रा भिकू जानकर सर यांच्या नेतृत्वाखाली लांबोरे कुटूंबाला मदत देण्यासाठी गेले असता या शिष्टमंडळात संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रा भिकू जानकर, श्री रामचंद्र बाबू आखाडे, श्री गणपत पटकारे, श्री संकोश बारकू आखाडे, श्री रामचंद्र झोरे, कु.समिर भागोजी आखाडे, कु. संतोष आखाडे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या कार्यकर्त्यांना लांबोरे कुटुंबापर्यंत घेऊन जाण्यासाठी लांजा तालुक्यातील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रा.विलास गोरे सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेकडून व संघटनेने केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध स्तरावर लांबोरे परीवाराला मदत होत असल्याने लांबोरे परीवाराकडून समाधान व्यक्त होत आहे.
संकटग्रस्त निराधार लांबोरे परीवाराला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील आसे आश्वासन संघटनेच्या वतीने प्रा भिकू जानकर सर यांनी लांबोरे परीवाराला दिले.
*दखल न्यूज भारत*