सेवानिवृत झालेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांच्या सत्कार बल्लारपुर नगर परिषदला थ्री स्टार रँक मिळवुन देण्यात स्वच्छता कर्मचार्‍यांचा मोठा वाटा ….हरीश शर्मा

114

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांच्या सेवानिवृती निमित्य नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी हरीशजी शर्मा यांनी संबोधन करतांना म्हणाले कि स्वच्छता कर्मचारी हे योध्दा आहे.त्यांच्या परिश्रमानेच आज बल्लारपुर नगर परिषदेला थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला.कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतांना सुध्दा स्वच्छता विभागाचे कार्य मात्र थांबले नव्हते.आपली व आपल्या परिवाराच्या जिवाची पर्वा त्यांनी केली नाही असे कार्य फक्त एक योध्दाच करु शकतो.त्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक,उप मुख्याधिकारी कातकर सर, नगरसेवक येलय्याजी दासरफ नगर परिषदेचे अधिकारि व कर्मचारी उपस्थित होते.संचालन कार्यालय अधिक्षक सौ.संगीता उमरे व आभार प्रदर्शन कातकर यानी केले.