कोकणासाठी स्वतंत्र कर्करोग निदान उपचार संशोधन केंद्र उभारण्याची समविचारींची मागणी

 

प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर.

रत्नागिरीः कोकणात कर्करोग बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यादृष्टीने त्यावर सर्व सोयीने युक्त उपचार केंद्र उपलब्ध नाही.त्यासाठी अशा रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागते.हे खर्चीक आणि मानसिक दृष्ट्या हिताचे नाही म्हणून रत्नागिरी येथे सुसज्ज सर्वसोयीने युक्त उपचार,निदान आणि संशोधन असे भव्य कर्करोग रुग्णालय उपलब्ध करावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सादर केलेल्या निवेदनासह राज्य पदाधिकारी सर्वस्वी समविचारीचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये,महाराष्ट्र प्रमुख रणधीर अंब्रे,सरचिटणीस संजय पुनसकर,राज्य महिला सरचिटणीस अँड.वर्षाताई पाठारे,प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी,अरविंद पत्की,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा प्रमुख निलेश आखाडे,ठाणे शहर प्रमुख राजेंद्र गोसावी,मुंबई प्रमुख रमेश कदम,जान्हवी कुलकर्णी,अँड मनिषा घरत,महिला प्रमुख दिपिका बापट,आदींनी आपआपल्या जिल्हा स्तरावरील हे निवेदन दिले.
सदर निवेदनात जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दिली जाणारी सेवा महागडी असून नातेवाईकानांही अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तेव्हा रत्नागिरी येथे हे रुग्णालय सुरु करुन गोरगरिबांना न्याय द्यावा अन्यथा संविधानाला अनुसरून तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदर पदे तात्काळ भरण्याची तजवीज केली जात असल्याचे राज्य आरोग्य विभागाकडून कळविण्यात आल्याचे समविचारी च्या वतीने सांगण्यात आले आहे.

*दखल न्यूज भारत*