कोरोणा पॉझिटिव्ह पदवीधर मतदार त्यांनी पीपी किट परिधान करून बजावला मतदानाचा हक्क

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची : महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील तहसिल कार्यालयातील मतदान केंद्रावर कोरोणा पॉझिटिव्ह पदवीधर मतदारांनी कोरची येथील ccc कोविड सेंटर मधून पीपी किट परिधान करून दुपारी 2.50 वाजता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर ती आल्याने पोलीस व प्रशासनाची धांदल उडाली होती.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कोरची येथील मतदान केंद्रावर 500 मीटर अंतरावर असलेल्या ccc कोविड सेंटर मधून आरोग्य विभागाच्या बोलोरो गाडीने येऊन मतदानाचा हक्क बजावला सदर रुग्ण मतदान केंद्राच्या परिसरात येताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात असलेल्या लोकांना बाहेर काढूले तर मतदान केंद्रावर कार्यरत अधिकारी यांनी सहकार्य केले
कोविड-19 च्या अनुषंगाने या मतदान केंद्रावर थर्मल स्कनिंगची व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्रावर सॅनिटायझर, मास्क, ग्लोजची व्यवस्था करण्यात आली होती . कोरोना सदृश्य व्यक्ती आढल्यास कोरोना संसर्ग होऊ नये, याबाबतची विशेष काळजी घेण्यात आली. कोरोना बाधित मतदारास शेवटच्या तासांत मतदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते
कोरची तालुक्यात एकूण 453 मतदाता आहेत त्यापैकी 255 पुरुष तर 80 महिला असे एकूण मतदातांनी आपला मतदानाचा हक्क बाजावीत 73.95 टक्के मतदान पूर्णत्वास आले नागपूर विभागात एकूण 19 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केले होते त्याकरिता निवडणूक विभागाने दिलेल्या नियोजित वेळेनुसार सकाळी 7.00 वाजता मतदान सुरु करण्यात आले आणि नियोजित वेळेनुसार दुपारी ठीक 3.00 वाजता मतदान करण्याचे काम बंद करण्यात आले निवडणूक कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मतदान केंद्राध्यक्ष सी आर भंडारी, सुक्ष्म निरीक्षक गुपतेशवर मतदान अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.