बसपा प्रदेश अध्यक्ष ताजने यांच्या अकार्यक्षम शैली विरोधात पदाधिकारी विवेक हाडके व प्रफुल्ल माणके यांचा राजीनामा

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: २ डिसेंबर २०२०
बसपा चे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या अकार्यक्षम शैली मुळे नाराजी व्यक्त करीत बसपाचे माजी शहर अध्यक्ष तसेच माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विवेक हाडके आणि प्रफुल्ल माणके माजी सचिव प्रदेश कार्यकारिणी यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
विवेक हाडके व प्रफुल्ल माणके यांनी प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांना पाठवलेल्या राजीनाम्यात स्पष्ट आरोप केला की, संदीप ताजने जेव्हा पासून बसपाचे प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हा पासून त्यांनी एकही निवडणूक न लढविण्याचे क्रृत्य वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात केले. नागपूर जिल्हा परिषद, तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघाकरिता कित्येक निष्ठावान आणि लायक उमेदवार असतांना त्यांना निवडणूक लढविता आली नाही. संदीप ताजने यांनी कित्येक पदाधिकारी यांचेकडुन पदासाठी लाखो रुपये उकळले असा आरोप विवेक हाडके व प्रफुल्ल माणके यांनी संदीप ताजने यांच्या वर केला आहे. तसेच मनुवादी ताकदीच्या इशाऱ्यावर ते फुले शाहु आंबेडकरी विचारधारा व बसपा पक्ष संपविण्याच्या द्रृष्टीने ताजने कार्य करीत आहेत त्यांच्या बाबतीत वरिष्ठांना लेखी तक्रारी दिल्यानंतर ही वरिष्ठ नेत्रृत्वांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बसपा चा कैडरबेस कार्यकर्ता दुखावला गेला. आणि त्यांच्या अकार्यक्षमता वर ठपका ठेवत आपल्या पदाचा राजीनामा विवेक हाडके व प्रफुल्ल माणके यांनी दिला आहे.