रत्नागिरीत २४ तासात ४७ नवे रुग्ण; एकूण पॉझिटिव्ह १३०९

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी : गेल्या २४ तासात प्राप्त अहवालांमध्ये ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या १३०९ झाली आहे. दरम्यान १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७६८ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय १, संगमेश्वर २, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली १५ आणि १ कामथे, चिपळूण मधील आहेत. पॉझिटिव्ह रुग्णजिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – २१ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे, चिपळूण – २४ रुग्ण, कळबणी, खेड – १ रुग्ण, ॲन्टीजेन – १ रुग्ण
आज पर्यंत एकूण पॉझिटिव्ह -१३०९, बरे झालेले – ७६८, मृत्यू – ४२, एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – ४९९ इतके आहेत.

दखल न्यूज भारत