मुल येथील वार्ड क्रमांक १२ येथे रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

उलगुलान संघटनेने निकृष्ट बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

 

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

मूल :- मुल नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १२ सावरकर वार्ड मध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांच्या घरापासून ठेव नखाते यांच्या घरापर्यंत रोडचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होत आहे असे तेथील नागरिकांनी उलगुलान संघटनेला सांगितले.तात्काळ उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली असता त्याठिकाणी दबाई बरोबर झालेली नसल्याचे आढळले.GSB सहा इंच दबाई करण्याचा नियम असताना त्या ठिकाणी चारच इंच दबाई करण्यात आली होती. रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट होतानाचे आढळून आले. संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरला विचारणा केली असताना उद्धटपणे उत्तरे दिली. याठिकाणी जनतेची व प्रशासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तरी या भ्रष्टाचाराची चौकशी तात्काळ करण्यात यावी करिता उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मुल यांना निवेदन दिले.
जर संबंधित रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, साहिल मेश्राम, वतन चिकाटे, चेतन दहिवले, हर्षल भुरसे, साहिल खोब्रागडे, हर्षल भिमटे, उपस्थित होते तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.