बल्लारपूर येथे शहीद टिपू सुलतान यांची २७० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

बल्लारपुर :- इंग्रजांना भारत देशातून हद्दपार करण्यासाठी आयुष्य वेचणारे , शेतकऱ्यांसाठी आधुनिक संकल्पना मांडणारे तसेच भारत देशाचा नावलौकिक संपूर्ण जगात होण्यासाठी आधुनिक क्रांती करणारे दक्षिण भारताचे चे महानायक शहीद टिपू सुलतान यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बल्लारपूर येथे हजरत टिपू सुलतान फाउंडेशन च्या वतीने २७० व्या टिपू सुलतान जयंती निमित्य प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि अमजद शेख अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फौंडेशन चंद्रपूर होते , मुख्य वक्ता दिलीप चौधरी संभाजी ब्रिगेड , प्राध्यापक अनिल डहाके , समाजसेवक ताजुभाई शेख , शरीफ गुरुजी , असलम चाऊस, अमजद शेख आणि इमरान शेख मंचावर उपस्थित होते
याप्रसंगी दिलीप चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि टिपू सुलतान हे केवळ तलवार आणि मिसाइल म्हणून नवे तर एक उत्कृष्ट शेती धोरण राबिविणारे राजे म्हणून देखील आठवणीत राहतील, सर्व प्रथम दलित महिलांना समजात योग्य तो संम्मान टिपू सुलतान यांच्या  मुळे प्राप्त झाला , रेशीम उद्योग आणी पाणी नियोजन साठी टिपू सुलतान यांनी केलेले भरीव असे कार्य आजतागायत कानडी आनि मद्रास च्या लोकांसाठी लाभदायी आहे असे सांगितले , प्रा अनिल डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि ह्या देशात हिंदू आणि मुस्लीम एकोप्याने राहत आहे आणि भविष्यातही हे चित्र असेच असेल तसेच हजरत टिपू सुलतान फौंडेशन च्या वतीने माघील ५ वर्षात भरीव असे प्रबोधन होत आहे असे कार्य एक चांगल्या समाज निर्मतीसाठी खूप पोषक आहे असे सांगितले .
कार्यक्रमात टिपू सुलतान यांच्या जीवनावर भाषण स्पर्धा आयोजित केली होती  , कार्यक्रमात स्पर्धा विजेत्यांना रोक रक्कम, प्रशस्ती पत्र तसेच टिपू सुलतान शहीद पुस्तक देऊन संम्मानीत करण्यात आले
कार्यक्रमाच्या शेवटी इंजि अमजद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संगीतले कि हजरात टिपू सुलतान फौंडेशन मार्फत या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात शहीद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली , आम्ही माघील ५ वर्षांपासून हिंदू मुस्लीम एकते साठी प्रयत्न केले आणि गाव खेड्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज , टिपू सुलतान , वीर बिरसा मुंडा , शाहू  , फुले आणि आंबेडकरी विचार मांडले , फौंडेशन च्या माध्यमातून चांगले वक्ते तय्यार करून समाज प्रबोधन केले , भाषण स्पर्धा विजेता सर्व लहान मोठ्या मित्रांना असे मंच तयार करून देणे हि आमची सामुहिक जवाबदारी आहे आणि टी आम्ही चोक पर पडू असे सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सलमान शेख तर  प्रास्ताविक बल्लारपूर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केले , आभार मोहसीन खान यांनी मानले तर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी आफताब पठाण , सद्दाम शेख , करीम शेख , ईसमाईल शेख , तंजील शेख , वाजीद खान , सिकंदर खान , सलमान बेग , मुनाजीर  हुसेन , सोहेल खान , शहबाज खान अहो रात्र कष्ट केले असे कादिर शेख यांनी सांगितले.