गडचिरोली जिल्हयात पदविधर साठी 72.37 टक्के मतदान मागील पदविधर निवडणूकीच्या तुलनेत यावेळी डबल वाढ

 

उपसंपादक / अशोक खंडारे

गडचिरोली जिल्हयात नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूक 2020 मध्ये 72.37 टक्के मतदान झाले. मागील पदविधर निवडणूक 2014 च्या 35.86 टक्क्यांमध्ये 36.51 टक्के म्हणजे डबल वाढ नोंदविली गेली. जिल्हयातील एकूण 12448 मतदारांपैकी 9008 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. यामध्ये केलेल्या मतदानात पुरूष मतदार 6751 तर महिला मतदार 2257 अशी आकडेवारी आहे. जिल्हयात सकाळी 7.00 वा. ते दुपारी 3.00 वा.पर्यंत एकूण 21 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 19 उमेदवार नागपूर विभागातून निवडणूकीसाठी उभे आहेत. या मतदानाची मतमोजणी नागपूर येथे दि.3 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

जिल्हयात तालुकानिहाय यात गडचिरोली तालुक्यात 3335 मतदारांपैकी 2303 मतदारांनी (69.05 टक्के) मतदान केले, अहेरी 840 मतदारांपैकी 649 मतदारांनी (77.26 टक्के) मतदान केले, आरमोरी 1681 मतदारांपैकी 1246 मतदारांनी (74.12 टक्के) मतदान केले, भामरागड 135 मतदारांपैकी 108 मतदारांनी (80.00 टक्के) मतदान केले, चामोर्शी 1718 मतदारांपैकी 1168 मतदारांनी (67.98 टक्के) मतदान केले, धानोरा 423 मतदारांपैकी 323 मतदारांनी (76.36 टक्के) मतदान केले, एटापल्ली 392 मतदारांपैकी 250 मतदारांनी (63.78 टक्के) मतदान केले, कोरची 453 मतदारांपैकी 335 मतदारांनी (73.95 टक्के) मतदान केले, कुरखेडा 1051 मतदारांपैकी 880 मतदारांनी (83.72 टक्के) मतदान केले, मुलचेरा 441 मतदारांपैकी 358 मतदारांनी (81.18 टक्के) मतदान केले, सिरोंचा 426 मतदारांपैकी 288 मतदारांनी (67.61 टक्के) मतदान केले व देसाईगंज 1409 मतदारांपैकी 1100 मतदारांनी (78.06 टक्के) मतदान केले. यामध्ये संख्यात्मक मतदानात गडचिरोली तालुक्यात सर्वांत जास्त 2303 मतदारांनी सहभाग नोंदविला.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष व्यवस्था : जिल्हयातील सर्वच मतदान केंद्रावर प्रशासनाकडून हात धुण्यापासून ते मास्क वाटप करणे असेल तसेच मतदारांच्या रांगांमध्ये उभे राहण्याची व्यवस्था असेल सर्वच स्तरावर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. आलेल्या मतदारांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. प्रत्येक बुथ जवळ प्रत्येक मतदाराचे ऑक्सीजनचे प्रमाण तपासणी व शरिराचे तापमान मोजले जात होते. तसेच मतदानापुर्वी मतदार जणजागृती मोहिमही चांगल्या प्रकारे जिल्हयात राबविली गेली. यातूनच यावेळी मतदानाचा टक्का वाढला असे म्हणता येईल.

*दुपारपर्यंत मतदारांमध्ये उत्साह* : दुपारी 3.00 वा ची वेळ जिल्हयासाठी अंतिम असल्याने दुपारच्या सत्रात मोठया प्रमाणात गर्दी गडचिरोली सह चामोर्शी तसेच वडसा येथे पाहवयास मिळाली. बरोबर 3.00 वा मतदान केंद्रात प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली. मतदान केंद्रातील व्यवसथा, लोकांमधील मतदान करण्याची जागृती यातून मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये उत्साह असल्याचे निदर्शनास येत होते.

जिल्हाधिकारी, दीपक सिंगला : जिल्हयातील पदविधर मतदारांची नोंदणी जवळजवळ 2014 च्या संख्येऐवढीच नोंदविली गेली. मात्र मतदानाची टक्केवारी यावेळी चांगल्या प्रकारी सुधारली आहे. जिल्हयातील प्रशासनाने उत्तम प्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडली. सर्व मतदारांचे खुप खुप आभार की त्यांनी कोरोना संसर्ग काळात आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनाने केलेल्या आवाहानाला साथ दिली. जिल्हयातील मतदानाचा टक्का यावेळी वाढला ही समाधानाची बाब आहे. मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे विशेष अभिनंदन.

उपजिल्हाधिकारी, निवडणूक कल्पना निळ : जिल्हयात मतदान नोंदणीसाठी यावेळी तालुकास्तरावर मोठया प्रमाणात जागृती करण्यात आली. तेव्हापासूनच मतदानाविषयक जागृतीचे काम सुरू होते. गडचिरोली जिल्हयात नेहमीच मतदार जागृतपणे आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. यावेळी मागील 2014 च्या निवडणूकीच्या तूलनेत चांगली टक्केवारी पाहयाला मिळाली. सर्व मतदार नागरिक व मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आभार.