खेड तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी ५२.८२ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ६८.३८ टक्के मतदान

 

राजगुरूनगर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी राजगुरूनगर (ता. खेड) येथील महात्मा गांधी विद्यालयात सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदारांचा उत्साह जाणवत होता. दुपारनंतर मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुरळक मतदार येत होते व आपल्या मताचे दान देऊन जात होते.

तालुक्यातील मतदार हे मोजकेच असल्यामुळे तत्सम संबंधित पक्षाचे कार्यकर्ते एका मतासाठी वारंवार आपल्या हितसंबंधी मतदारांना फोनवरून संपर्क करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक मतदारांनी पदवीधरसाठी नाव नोंदणी केली होती. मात्र त्यांचे मतदार यादीत नाव न आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार संघासाठी खेड तालुक्यामध्ये आळंदी देवाची, चाकण, कडूस, राजगुरूनगर, पाईट, वाडा अशी ६ मतदान केंद्र होती.

आळंदी देवाची मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ४५७ मतदार होते. त्यापैकी २१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४७. २६% मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १५९ मतदार असून त्यापैकी ९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ५९.११ % मतदान झाले.
यावेळी मतदान केंद्रावर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे डि.डि.भोसले,शिवसेनेचे शहरप्रमुख अविनाश तापकीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, मनसेचे अजय तापकीर,प्रसाद बोराटे यांनी आप आपल्या परीने मतदान करुन घेण्यासाठी परीश्रम घेतले.
चाकण मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ८११ मतदार होते. त्यापैकी ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४६.८५ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १४७ मतदार असून त्यापैकी १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ७३. ४६ % मतदान झाले.
कडूस मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण २८९ मतदार होते. त्यापैकी १४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४९.१३ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी ४९ मतदार असून त्यापैकी २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ५७.१४ % मतदान झाले.
राजगुरूनगर मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण १२२९ मतदार होते. त्यापैकी ७३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ५९.८३ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी २७८ मतदार असून त्यापैकी २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ७४.१० % मतदान झाले.
पाईट मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण २०३ मतदार होते. त्यापैकी १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४९. २६% मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ मतदार असून त्यापैकी १० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ६२.५ % मतदान झाले.
वाडा मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ७२ मतदार होते. त्यापैकी ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ५९. ७२ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी ०९ मतदार असून त्यापैकी ०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ४४.४४ % मतदान झाले.
पदवीधर मतदार संघासाठी ५२.८२ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ६८.३८ टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांतजी चव्हाण यांनी दिली.

यावेळी मतदान जरी मोजकेच असले तरी मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुलभाऊ देशमुख, काँग्रेसचे विजय डोळस, मनसेचे समीर थिगळे, शिवसेनेचे रामशेठ गावडे आणि गणेश सांडभोर आदींनी भेटी देऊन माहिती घेतली.
मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी १८ हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी ६ हॉल आहेत. त्‍यानुसार स्‍वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक हॉलमध्‍ये ७ टेबल असतील. त्‍याप्रमाणे पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक व १२६ शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी ४२ पर्यवेक्षक ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण ८५५ आणि शिक्षक मतदारसंघासाठी ३०५ अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. सुरक्षेसाठी ४५० पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्‍ध आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्‍या पहाता मतमोजणीला ३६ तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे. मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज आहे.