अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, दर्यापूरच्या वतीने वरिष्ठ सहाय्यक व गटसमन्वयक यांचा सत्कार

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर पं स शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक श्री प्रकाश साखरे व गटसमन्वयक श्री प्रमोद निर्मळ हे दि 1 डिसेंबर 2020 ला सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दर्यापूरच्या वतीने सत्कार करण्यात आला
मा सोनाली शिरभाते गटशिक्षणाधिकारी पं स दर्यापूर यांच्या अध्यक्षतेखाली साखरे व निर्मळ यांचा दर्यापूर पं स शिक्षण विभागात सत्कार करण्यात आला
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री हिरालालजी मकेश्वर, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना, शाखा दर्यापूरचे अध्यक्ष सतिश वानखडे, सचिव डि आर जामनिक, कार्याध्यक्ष सुरेंद्र पतींगे, कोषाध्यक्ष राजेंद्र सावरकर, सहसचिव गजानन इंगोले, तसेच संघटनेचे मार्गदर्शक विजय पवार, संजय साखरे, हारे व इतर मान्यवर उपस्थित होते