नागपूर पदवीधर मतदारसंघात २ वाजेपर्यंत ३२.९२ टक्के मतदान

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपूर १ डिसेंबर २०२०.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील ३२२ मतदान केंद्रावर सकाळी १२ ते २ दरम्यान ३२.९२ टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये ३५.१५ टक्के पुरुषांनी तर २९.४९ टक्के महिला पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर २८.५४ टक्के, भंडारा-३७.६९ टक्के, चंद्रपूर-३६.८९ टक्के, गोंदिया-३३.०३ टक्के, गडचिरोली-४०.५४ टक्के, वर्धा-३८.८४ टक्के

सकाळी ८ ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली. नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ५ आहे. विभागात २ लाख ६ हजार ४५४ मतदार आहेत.
पदवीधर निवडणूकीसाठी रवीनगर येथील दादाजी धुनिवाले मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे , व सौ.ज्योत्स्ना ठाकरे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार व श्रीमती सुप्रिया यांनी मतदानाचा हक्क बजावला .
नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुद्धा कामठी रोडवरील नागसेन विद्यालयात जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११ वाजता नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी तारकुंडे धरमपेठ मुलांची शाळा, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अभिजीत वंजारी, संदीप जोशी यांनी सुद्धा सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.

कांग्रेस नेता राजेन्द्र मुळक व सुरेश भोयर यांनी कांग्रेस च्या बुथला दिल्या भेटी

कामठी

दिनांक १/१२/२०२० रोजी राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी *कामठी* येथील बुथ वर भेट दिली. या वेळी सुरेश भोयर (महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), कृष्ण यादव, अनुराग भोयर, शकुर नागानी, धीरज यादव, इरशाद शेख, दिनेश ढोले, फैजल नागानी, राजु बनसिंगे, प्रशांत काळे उपस्थित होते.

महादुला-कोराडी

कामठी तालुक्यातील *कोराडी- महादुला* येथे महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० च्या मतदाना संदर्भात कोराडी कॉलनी येथील बूथवर आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांनी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, वासुदेव बेलेकर, संजय रामटेके, हर्ष वानखेडे, लक्ष्मीकांत धनुले, शंकर सोनेकर, दयाल शाहु, प्रविण मेश्राम, आकाश रंगारी, प्रविण उगले, संतदास सारवा, संदीप खोब्रागडे, शुभम सोमवंशी, विशाल वासनिक व भागातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मौदा
मौदा येथील महाविकास आघाडी च्या बुथवर कांग्रेस नेता सुरेशभाऊ भोयर यांनी भेट दिली. त्यावेळी बुथवर जि. प. सभापती तापेश्वर वैद्य, तुळशीराम काळमेघ, छत्रपाल करडभाजने, विष्णु साठवणे ओमशंकर साठवणे आदी प्रामुख्याने मतदारांच्या संपर्कात होते.