सिने अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांनी केला शिवसेनेत प्रवेश सौ. रश्मीताई ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हातावर बांधले शिवबंधन

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत

मुंबई: १ डिसेंबर २०२०
बाँलिवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
काही दिवसापूर्वी उर्मिला मार्तोंडकर यांनी कांग्रेस च्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. कंगना प्रकरणावरून उर्मिला मार्तोंडकर हिने कंगना रनौत हिला स्वतःला मुंबईकर असल्याचे सांगून कंगना रनौत हिच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला होता. तिच्या परखड देशभक्त विचारांचे स्वागत करीत शिवसेना पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कला क्षेत्रातुन राज्यपाल नियुक्ति करिता उर्मिला मार्तोंडकर हिचे नाव राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडे पाठवले आहे.
आज त्याच पार्श्वभूमीवर उर्मिला मार्तोंडकर आता कांग्रेस सोडून शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगल्या आहेत. यावेळी ना. आदित्य ठाकरे, ना. देसाई, मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होत्या.