कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोधमोहीम , 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 जनतेने सहभाग घेऊन सहकार्य करावे . डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांचे आवाहन

 

ऋषी सहारे
संपादक

महाराष्ट्र राज्यातील covid-19 आपात्कालीन परिस्थिती मुळे कुष्ठरुग्ण व रुग्ण यांना निदान व औषधोपचारासाठी आणण्याचा प्रमाण यावर बराच परिणाम झाला आहे, यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचेकडून रुग्णांना लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजाराचे रुग्ण निदान व उपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णांना या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो व सहवासातील इतर लोकांना ही या रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो म्हणून समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्णांचा शोध घेऊन लवकरात लवकर निदान निश्चिती नंतर औषधोपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संयुक्त सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 राबविण्यात येणार आहे त्याकरिता जनतेनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार यांनी केले आहे.
याकरिता उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल आरोग्य सेवा नागपुर सर्कल नागपुर, योगेश कुंभेकर भारतीय प्रशासकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी नागपूर, डॉ. पाथरकर cs, डॉ. दीपक सेलोकर डी एच ओ, डॉ.बी एस मडके सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग ,
डॉ. ममता सोनसरे जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. धर्म ठोक यांचे मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्यस्वयंसेवक यांची सभा व प्रशिक्षण घेण्यात आले.
सभा व प्रशिक्षण करीता डॉ. प्रेरणा, डॉ. कमलेश, डॉ. आरती, प्रगती लता काळे, सुनील गोतमारे , प्रमोद सयाम, पुरुषोत्तम ठाकरे, मारोती ठाकरे, निशांत नाईक, कदम मांढरे, राजकुमार चहांदे, अमित भगत , भारती सजनवार, राजू राऊत , निरंजना बागडे, अरुणा चामट, मीना महाजन, प्रीती साहू , सरला राऊत, कांचन मराठे संजीवनी घरडे माया कोल्हे , शिल्पा पाटील, सचिन भारत मुंडले, चिखले इमले प्रीती कोरटकर यांनी सहकार्य केले.