दुर्लक्षित कामावर युवक कांग्रेसचे अध्य्क्ष मेहरबान

 

सावली.. सुधाकर दुधे
चंद्रपूर गडचिरोली रोड लागत आठवडी बाजार रोडवर मोठमोठे खडे पडल्याने अनेक लहानमोठे अपघात होत असतात मात्र संभंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नितीन दुवावार यांनी स्वतः आर्थिक भार सोसून रस्ता सुरडीत केल्यानेनागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सावली तालुक्याचे ठिकाण असून बहुतांश गावातील नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ये जा करावी लागत असते मात्र आठवडी बाजारच्या मुख्य प्रवेश द्वारा ताच रोडचे काम सुरु असल्याने रोडच्या श्रमते पेक्षाही मोठमोठे हायवा सुरु असल्याने मोठा खडा पडला असून रोडवर पाणी टाकण्यासाठी याच ठिकाणाहून पाणी भरीत असल्याने खडा असलेल्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना पायी. दोनचाकी. चारचाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती तसेच याच ठिकाणी अनेक लहानमोठे अपघात सुद्धा झाले आहेत त्यामुळे संभंधित विभागएखाद्या जीवितहानीची वाट तर बघत नाही ना अशीही चर्चा जनसामान्यात चर्चा सुरु होती.
मात्र आज पदवीधर मतदान सुरु असल्याने सदर ठिकाणच्या सभोवताल अनेक पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. सदर रस्ता रहदारीचा असल्याने आजही दोन किरकोळ अपघात झाले त्यामुळे तालुका युवक कांग्रेस चे शहर अध्यक्ष नितीन दुवावार यांनी स्वतः लक्ष घालून गीठ्ही व मुरूम टाकून खडा बुजविले त्यामुळे रस्ता सुरडीत झाल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले यावेळी ऍड. लाडे. स्वप्नील संतोषवार मनोज चोधरी. भोजराज मोहुर्ले. आकाश खोब्रागडे. सुनील ढोले. नरेंद्र डोहाने सुनील पाल सुधाकर दुधे. उपस्थित होते