वन विभागामार्फत रोजगार हमीच्या कामांना ठेंगा -रोजगार हमीची कामे करण्यास केली जाते टाळाटाळ

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांसाठी अकुशल व कुशल कामे केली जातात.अकुशल कामे ६० टक्के तर कुशल कामे ४० टक्क्यांच्या आधारावर केली जातात.रोजगार हमीमध्ये पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत निहाय व तहसील स्तरावर यंत्रणा निहाय कामे केली जातात.दरवर्षी कामांचा नियोजन आराखडा तयार करून कामे सुरू केली जातात.मात्र अजूनही कामे सुरू केली गेली नसल्याने मजुर वर्ग चिंतेत आहे.
यंत्रणा यामध्ये सिंचाई विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,तालुका कृषी,जी.प.बांधकाम विभाग व वन विभागामार्फतीने रोजगार हमीची कामे करून शंभर दिवस मजुरांना एका वर्षात काम दिले जाते.सुरुवातीला सर्वच विभाग रोजगार हमीची कामे करायची मात्र जेव्हा पासून त्यांची स्वतःची कामे स्वतःच करायची लॉगिन सुरू झाली तेव्हापासून काही विभाग वगळता वन विभागाने जेमतेम बोटावर मोजण्या इतकीच रोजगार हमीची कामे करायला सुरुवात केली.स्वतःची लॉगिन सुरू व्हायच्या अगोदर वन विभागामार्फत वनतलाव,सिमेंट प्लग बंधारे,दगडी बंधारे,रोपवाटिका,टी सी एम नाली बांधकाम,रोपवन व इतर बरीच अशी कामे तहसील कार्यालयाची लॉगिन सुरू असतांनी केली जायची.मात्र आजची परिस्थिती लक्षात घेता कां बरं वन विभागामार्फत रोजगार हमीची कामे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे अजूनही लक्षात आलेले नाही.
प्रत्तेक तालुका स्तरावर वन परिक्षेत्र अधिकारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कामे सुरू करून त्यावर देखरेख ठेवीत असतो.मात्र मागील वर्षी दोन ते तीनच कामे केली गेल्याने मजूर वर्ग नाराज झाला आहे.कारण की सर्वात जास्त अकुशल कामे ही वन विभागामार्फत केली जायची.सर्वात जास्त मनुष्यदिन निर्मिती ही वन विभागामार्फत व्हायची.याकडे गाम्भीर्य पूर्वक लक्ष घालून व मजुरांना काम मिळावे याकरीता वन विभागाने रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे सुरू करावी अशी मागणी मजुरांची आहे.