ग्रामपंचायत आष्टी व ईलूर ची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध हरकती व आक्षेप ७/१२/२०२० पर्यंत घेता येईल.

 

उपसंपादक / अशोक खंडारे

ग्रामपंचायत आष्टी व ईलूर सार्वत्रिक निवडणूक २०२० प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी दिनांक १ डिसेंबर २०२० ला प्रसीद्ध करण्यात आली आहे.
सदर यादी आष्टी व ईलूर ग्रामपंचायत कार्यालय येथे आणि तलाठी कार्यालयात नोटीस फलकावर लावण्यात आली आहे ज्या मतदारांना हरकती व आक्षेप घ्यायचा असेल त्यांनी दिनांक १/१२/ ते ७/१२/२०२० पर्यंत तहसीलदार चामोर्शी येथील निवडणूक विभाग येथे आक्षेप स्विकारले जाणार आहेत. दावे व हरकती निकाली काढल्यानंतर प्रभाग निहाय अंतीम मतदार यादी दिनांक १०/१२/२०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येईल .याची आष्टी व ईलूर येथील मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार चामोर्शी यांनी केले आहे.