नानाभाऊ पटोले सोशल फोरमच्या तालुका अध्यक्षपदी विद्यार्थीनी रोहिणी रणदिवे

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले दखल न्युज भारत

साकोली : लोकनेते नानाभाऊ पटोले सोशल फोरमच्या साकोली विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी रोहिणी रणदिवे यांची नियुक्ती नुकतीच महाराष्ट्र प्रदेश नानाभाऊ पटोले सोशल फोरम संस्थापक मा. विनोद चौधरी, प्रदेश महासचिव मा. कैलाश गाढवे पाटील यांच्या पत्रानुसार झाली.
साकोली शहरातून नाही तर आता ग्रामिण भागांतून युवा विद्यार्थीनी सोशल मिडीयावर कसे आपले वर्चस्व काबिज करेल याची अभिनव प्रचिती दिली आहे साकोली तालुक्यातील सोनेगांव येथील युवा विद्यार्थीनी रोहिणी रणदिवेनी. रोहिणी रणदिवे यांची नियुक्ती नुकतीच वरीष्ठांच्या आदेशान्वये नानाभाऊ पटोले सोशल फोरम साकोली तालुका विद्यार्थी अध्यक्षपदी करण्यात आली. रोहिणी रणदिवे यांचेशी संवाद केला असता रोहिणी रणदिवे हिने सांगितले की ग्रामिण क्षेत्रातील आता मोबाईल क्रांतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिला विद्यार्थी बाबद आवाज उचलणे शक्य होईल व याचेच उदाहरण म्हणजे सोशल फोरम आहे. तीने आपले श्रेय आईवडील, मुख्याध्यापक व विधानसभाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांना दिले आहे.