शिवसेना, युवासेना व जय भवानी मित्र मंडळ, घाणेखुंट चा ऑनलाईन जिल्हास्तरीय गड-दुर्ग स्पर्धेचा निकाल जाहीर

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, युवासेना व जय भवानी मित्र मंडळ, घाणेखुंट कडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरीय गड-दुर्ग स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग दर्शवला। सुमारे १६५ स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारची किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून आपली कला दाखवली यामध्ये सर्वानी ०२:००मिनिटाचा विडिओ काढून किल्ल्याची माहिती देण्यास सांगितले होते।
यामध्ये प्रथम क्रमांक- ग्रीन कॉ. परांजपे स्कीम पागमाळा चिपळूण, द्वितीय क्रमांक-गुणदे तांबडवाडी मित्र मंडळ ता. खेड,
तृतीय क्रमांक- स्वराज्य सेना मित्र मंडळ जुवाठी, राजापूर
यांनी मिळविला विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी सरपंच अंकुश काते यांनी विजेत्यांचे कौतुक केले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कलाकृती रुजविल्याबदल आभार मानले। यावेळी अरुण ठसाळे, सुरेश मोगरे, दत्ताराम काते, मसूद सुर्वे, दत्ताराम खताते, सुभाष गवळी, नरेश कलमकर, शांतू भोसले उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाखेच्या व मंडळाच्या पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली।
*दखल न्यूज भारत*