बसपा सुप्रिमो बहन मायावती,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.वामन मेश्राम,यांचे राष्ट्रीय स्तरावरील महान कार्येच,देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सार्थकी ठरत आहेत…. — प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यपद्धतीला व कार्यप्रणालीला ओळखण्याची क्षमता देशातील तरुणांनी स्वत:त निर्माण करणे आवश्यक!

210

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नासमज-अज्ञानी,अन्याय व अत्याचाग्रस्त,शोषित-पिडित आणि अधिकार हक्कापासून वंचित ठेवल्या गेलेल्या,”जनसामान्यांच्या सर्व प्रकारच्या अभेद सुरक्षित हितासाठीत,भारत देशात कार्ये करणे म्हणजे अफाट श्रमकरण्याची इच्छाशक्ती व तर्कसंगत विचार मांडण्याची कायदेशीर कार्यपद्धत,असणारे चारित्र्य संपन्न व संवेदनशील मनाचे व्यक्तीत्व असने गरजेचे आहे.(उत्कृष्ट कार्ये करणारे असे अनेक व्यक्तीत्व भारताच्या भुमीवर आहेतच.) परंतू ज्या शिस्तबध्द कार्यप्रणाली नुसार बसपा सुप्रिमो बहन मायावती व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.वामन मेश्राम,”हे,आपल्या सर्वोत्तम कर्तव्यातंर्गत,”सतर्क व जागरूकपणे,”जनहितार्थ, “जे, कार्ये पार पाडतात,”ते,अतिशय प्रभावी व परिणामकारक आहेत,”हे,न विसरणारेच.
कोविड १९ अंतर्गत देशात लागू असलेल्या संचारबंदी काळात,”देशातील तमाम,मजूर,श्रमीक,गोरगरीब,शेतमजूर,शेतकरी,यांची,”ज्या प्रकारे,कर्तव्यहिनते द्वारा शासन स्तरावरुन अहवेलना केल्या जात होती व प्रताडणा केल्या जात होती,”तेव्हा,बसपा सुप्रिमो बहन मायावती व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.वामन मेश्राम,”यांनी,जनसुरक्षातंर्गत जनहितार्थ दाखवलेली संवेदनशीलता आणि अन्याय व अत्याचारा विरोधात उठवलेला दमदार आवाज,करोडो अन्यायग्रस्तांना व अत्याचारग्रस्तांना धिर देवून गेला.
पर्यायाने या दोन्ही नेत्यांच्या प्रभावी कार्यपद्धतीचा परिणाम केंद्र सरकार व अनेक राज्यांतील सरकारे यांच्यावर पडला,आणि झोपलेली सरकारे खडबडून जागे झाले असल्याचे देशातील जनतेंनी अनुभवले.
मात्र,अन्याय व अत्याचार करण्याच्या भारत देशात सध्यास्थित दोन कार्यपद्धती प्रचलित होत आहेत.त्यापैकी एक प्रत्यक्ष तर दुसरी अप्रत्यक्ष.अन्याय अत्याचार करणारी प्रत्यक्ष कृती हि दिसते तर अप्रत्यक्ष कृती दिसत नाही.परंतू अप्रत्यक्ष कृती ही भयानक व अती जहाल असते,अप्रत्यक्ष कार्यपद्धत म्हणजेच या देशातील तमाम नागरिकांना भनक लागू न देता,”शासन स्तरावरून किंवा इतर स्तरावरुन,नागरिकांच्याच विरोधात,करण्यात येत असलेली कार्ये होत व आखण्यात येत असलेली धोरणे होत.
अप्रत्यक्ष कार्यपद्धत ही सुद्धा प्रत्यक्ष असली तरी,अप्रत्यक्ष कार्यपद्धत ही देशातील नागरिकांवर दिर्घकालीन महाभयंकर अत्याचार व अन्याय,करणारी ठरते आहे.तद्वतच पिढ्यानपिढ्या दरपिढ्यां शोषणाच्या माध्यमातून बहुजनांना लाचार करून ठेवण्यास कारणीभूत ठरते आहे.
अप्रत्यक्ष पध्दतीच्या कार्यप्रणालीची जाणिव या देशातील नागरिकांना नसल्यामुळे,”देशातील नागरिक,भुलथापा देणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांच्या भुलथापांना बळी पडतात व बळीचे बकरे बनतात,”हे,या देशातील खरे चित्र आहे.
वैचारिक क्षमता नसलेले व बळी ठरलेले तरुण,तरुणी,नागरिक,हे डोळेझाक पणे अशा बेईमान नेत्यांसाठी कार्य करतात आणि स्वत: बरोबर,”स्वत:च्या समाजाला,अधिकार हक्कापासून वंचित ठेवण्याचे निरंतर काम करतात.हेच देशातील सर्वात मोठी समस्या आहे.
जातीद्वेष व जातीभेद या दोन बाबी देशातील नागरिकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी,उन्नतीसाठी,आड येत आहेत हे सत्य लपून नाही.परंतू जातीद्वेष व जातीभेद या दोन मानसिकता,”नागरिकांना,”स्वत:वर होत असलेला अन्याय,अत्याचार,कळू देत नाही किंवा स्वत:वरील शोषणही लक्षात येवू देत नाही.एवढी मोठी विस्मृर्ती या जातीद्वेशात व जातीभेदात अंतर्भूत आहे.
अशाही विषम स्थितीत बहुजन समाज पार्टीच्या सुप्रिमो बहन मायावती व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम,”यांचे,देशातील नागरिकांच्या हितासाठी,सुरक्षेसाठी,समाज एकसंघतेसाठी व समाज जागृतीसाठी सातत्याने सुरु असलेली कार्ये,प्रभावी आणि परिणामकारक आहेत.
बहन मायावती व मा.वामन मेश्राम हे दोन्ही नेते सदैव जागरूक,सतर्क,संवेदनशील,असतात,म्हणूनच या दोन्ही नेत्यांच्या संघटनेची भारदस्त ताकद आजच्या स्थितीत देशविदेशात असल्याने,”भारत देशातील शोषकांच्या जहाल व कुटील मनसुब्यांचे पितळ तात्काळ उघडे पडल्या जात आहे.परिणामत: या दोन नेत्यांची व संघटनेच्या कार्यकर्त्यांची कार्ये ही अभ्यासपूर्ण व कायदेशीर असल्याने,या दोन्ही नेत्यांमुळे व या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमुळे,देशातील नागरिक सतर्क,जागरूक होत आहेत व समजदार बनत आहेत.तद्वतच सर्वांच्या सुरक्षेसाठी,अत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी,अस्मितेसाठी,अधिकार हक्कासाठी,न थकता व न थांबता संघर्ष करीत आहेत.
बहुजन समाज पार्टी व भारत मुक्ती मोर्चा,ह्या दोन्ही संघटना भारत देशातील नागरिकांसाठी संपुर्णपणे सुरक्षित कार्ये करीत आहेत,यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित आहेत,हे वास्तव्य आहे.
मात्र,दोन्ही संघटनांचे कार्य,”हे,”त्यांच्या ध्येयधोरणाला व उद्दिष्टे याला,अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनांची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यभागाची आहेत,हे स्पष्टपणे जाणवते आहे व दिसून येते आहे.
“बसपाचे,ब्रीद वाक्य अलिकडच्या काळात,”सर्वजन हिताय व सर्वजन सुखाय,असे झाले आहे. “तर,”भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुख,”हे,भारत देशातील तमाम ओबीसी-एससी-एसटी-व्हिजेन्टी-एनटी,अल्पसंख्याक,मागासवर्गीय,यांच्या अस्तित्वासाठी,अधिकार व हक्कासाठी,ईमानदारी पुर्वक प्राणपणाने आणि सातत्याने संघर्ष करीत आहेत,झटत आहेत.आणि म्हणूनच या दोन्ही ताकदवर नेत्यांचे कार्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांची कार्ये,”ही,देशातील तमाम नागरिकांना निरंतर वेळेत सुरक्षित ठेवण्यासाठी सार्थकी ठरत आहेत एवढे मात्र निश्चित.