चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर येथे एकता सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

एकता सामाजिक संस्था जैरामपूर यांच्या कडून रक्तदान शिबिर राबविण्याचा हा पाचवा शिबीर होता

0
103

 

आष्टी प्रतिनिधी प्रविण तिवाडे मो. न.9579848548

सध्या कोरोना महामारी किव्हा संकटाच्या काळात रक्ताचा तुटवळा भासत आहे अशातच जैरामपूर येथील “एकता सामाजिक संस्था” यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जैरामपूर येथे श्री प्रफुलजी अलोने यांच्या मार्गदर्शनामध्ये ,एकता सामाजिक संस्था यांनी रक्तदान शिबिराचा अभिनव कार्यक्रम घडवून आणला
सध्या सगळीकडेच रक्ताचा तुटवडा भासत आहे या कठोर परिस्थिती मध्ये जौरामपूर येथील रक्तदान शिबिर आयोजक एकता सामाजिक संस्था व सर्व सक्तदाते हे जैरामपूर येथील रहिवासी आहेत आज या शिबिरात ऐकून 15 युवकांनी रक्त दान केलेले आहे चंद्रकांत वाढरे,कुलदीप फरकडे,कालिदास पावडे,तुषार कष्टी, प्रफुल अलोने, मारोती देवावर,हरेश निखाडे, नरेश हेपट,सुनील गौरकार, साईनाथ ताजने,राजू पावडे,सतीश ताजने,अमित ठेंगणे,प्रकाश गौरकार,दिवाकर भोयर असे 15 युवकांनि “रक्तदान हा श्रेष्ठ दान” हे आत्मसात करून असे अनेक वेळा रक्तदान करीत आहेत,
रक्ताची गरज लक्षात घेऊन,रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता, एकता सामाजिक संस्था जैरामपूर यांनी रक्तदानाचे आयोजन केले होते