टाटा एस व ऑपे ऑटोच्या समोरासमोर धडकेत एक ठार,बोराळा फाट्यावरील घटना

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
टाटा एस व ऑपे ऑटोची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार झाल्याची घटना काल संध्याकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बोराळा फाट्यावर घडली
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्यापूर वरुन बडनेरा येथे वराह घेऊन टाटा एस MH 30 AA 2582जात होता तर समोरुन ऑपे ऑटो क्र MH 27 X 54 हा ऑपे ऑटो शेतात कापसाचे गाठोडे आणण्यासाठी जात होता दोन्ही वाहनांची बोराळा फाट्यावर समोरासमोर धडक झाली त्यात आकाश सुनिल गग्गन वय 30 वर्षे रा जुनीवस्ती बडनेरा हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनास्थळचा पंचनामा खल्लार पोलिसांनी केला असुन वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास खल्लार पोलिस करीत आहेत