नागपर विभाग पदवीधर मतदानास तालुक्यातील पारशिवनी व कन्हान केन्द्रांत प्रशासन सज्ज.

 

कमलासिह यादव
पा ताः प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

पारशिवनी (ता प्र) : – नागपुर विभाग पदवीधर मतदा र संघाची निवडणुक मंगळवार दि. १ डिसेंबर २०२० रोजी पार पडणार असुन पारशिवनी तालुका अंर्तगत एकुण २ मतदान केंद्रात पुरुष ४१८ व महिला ३४५ असे एकुण तालुक्यात ७६३ पदवीधर मतदार आहेत. मतदान प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्या करिता जवळपास ५० अधिकारी, कर्मचा-यांची नियु क्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार वरूण कुमार सहारे यांनी दिली.

पाराशिवनी तालुक्यातील कन्हान परिसरातील भाग क्रमांक २२ चे सर्व पदवीधर मतदारात जिल्हा परिषद केद्रियं शाळा कन्हान-पिपरी खोली क्र.१ मध्ये करणा र यात होणारे मतदान केन्दात एकुण ४११पदवीधर मतदारास पुरुष २१६ , महिला १९४ व ईतर १ असे एकुण ४१० पदवीधर मतदार आपले मतदान करणार आहे. पारशिवनी मतदान केन्द्र क्रमांक भाग ८ मध्ये पारशिवनी व नवेगाव खेरी मंडळातील मतदार तहासि ल कार्यालय खोली क्र. १ यात पुरूष २०२ व माहिला १५१ असे एकुण ३५३ पदवीधर मतदार पाराशिवनी तहसिल कायालयातील केंद्रात मतदान करणार आहे. पारशिवनी तालुक्यातील दोन्ही मतदान केंद्रात एकुण ७६३ पदवीधर मतदार आपले मत मतदान सकाळी.८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार असुन प्रत्येक मतदान केंद्रात १ केंद्राधिकारी ३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.१ पुरुष व १ महीला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. कन्हान व पाराशिवनी मतदान केंद्रासाठी दोन क्षेत्रीय अधिकारी कर्तव्य पार पाडणार आहेत. हे मतदान ई.व्ही.एम. मशीन ऐवजी मत पत्रिके द्वारे होणार असुन मतदारांनी मतदान कर तांना निवडणुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन नेच क्रमांक टाकणे अनिवार्य आहे. टाकले ला क्रमांक आकड्यांतच असावा अक्षरी नसावा तसेच मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावा समोर 1 क्रमांक टाकणे अत्यावश्यक आहे. एकापेक्षा अधिक क्रमांक टाकु नये, तसे केल्यास ते मतदान ग्राह्य धरल्या जाणार नाही. या शिवाय कोरोना च्या पार्श्वभुमीवर प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग केली जाणार असुन सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार आहे. दोन मतदारांत ६ फुटांचे अंतर राखणे बंधनका रक आहे. मास्क लावल्या शिवाय मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान करण्यासाठी महीला, पुरुष व जेष्ठ नागरिकाना, दिव्यांगासाठी वेग वेगळ्या तिन रांगा लावण्यात येणार आहे. मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कन्हान व पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड तैनात केले जाणार आहे.