विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे यश विज्ञान शाखेतून सुष्मिता महापात्रा तालुक्यात प्रथम ऑटोमोबाइल टेक्नाॅलॉजीतून अमित मेश्राम बोर्डातून प्रथम प्रतिमा डोंगरवारने घेतले गणितात 100 गुण

117

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
आमगाव ता.19: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.16)जाहीर झाला. यात येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 96.60 टक्के लागला असून महाविद्यालयाने 12 वी परिक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेचा 99.43, कला 90.32, वाणिज्य 97.59,तर एमसीव्हीसीचा निकाल 90.69 टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेतून सुष्मिता माहापात्रा हिने 90.92 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम, आकांक्षा वाघमारे व अविनाश पाथोडे यांनी 89.84 टक्के गुण घेवून तालुक्यात द्वितीय, मधुमिता माहापात्रा हिने 89.07 टक्केु गुण मिळवून तालुक्यात तृतीय आली आहे. तर एमसीव्हीसीचा ऑटोमोबाइल शाखेतून अमित मेश्राम याने 83.60 टक्के गुण मिळवून नागपूर बोर्डातून प्रथम आला आहे. योगेश महारवाडे याने 81.07 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, विजय भोयर याने 80.76 टक्के गुण घेवून जिल्ह्यात तृतीय आला आहे. इलेक्ट्रिकल टेक्नाॅलाॅजी शाखेतून राहुल भांडारकर याने 86.46 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, हितेश उपराडे याने 86.15 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, शुभम मुर्खे याने 85.69 टक्के गुण घेवून जिल्ह्यातून तृतीय आला आहे. अकाॅउंटिंग ॲन्ड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून गुणेश्वर गुरूपंचांग याने 80.77 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, शीतल मेंढे हिने 80.31 टक्के गुण घेवून जिल्ह्यात द्वितीय व पुनम भांडारकर हिने 80.15 टक्के गुण घेवून जिल्ह्यात तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून लक्षिता गावराणे हिने 84.30 टक्के गुण घेवून तालुक्यात प्रथम, कुलदीप मौजे हा 83.69 टक्के गुण घेवून तालुक्यात द्वितीय, नेहा ठाकरे ही 82.46 टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय आली असून कला शाखेतून रजनी पटले ही 77.23 टक्के गुण मिळवून तालुक्यातून तृतीय आली आहे. तर प्रतिमा डोंगरवार हिने गणित विषयात 100, आकांक्षा वाघमारे व अविनाश पाथोडे या दोघांनीही गणित विषयात 99 गुण मिळविले आहे.
गुणवंतांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, सचिव बबनसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष नरेश माहेश्वरी, प्राचार्य डी.एस.टेंभुर्णे , प्रा. आर.डी.नाईक, प्रा. एन.आर.चित्ते, प्रा. जी.एस.लोथे व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.