संघर्ष वाहन चालक-मालक संघटनातंर्गत चालक मालकांचा १५० रुपयात २ लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार!

श्री अर्जून राठोड
महानगर प्रतिनिधी औरंगाबाद
दखल न्यूज भारत
संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत बी. देशमुख यांच्या संकल्पनेतून
तसेच संपूर्ण राज्यातील चालक-मालक बंधू व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या विचारातून १५० रुपयांत २ लाख रुपयांचा अपघात विमा उतरविला जाणार आहे.
संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांतजी देशमुख,यांनी चालक मालक यांच्या होणाऱ्या अपघातातंर्गत हाणी,यावर विचार करून म्हणजेच चालकांच्या अपघातामध्ये एक हात,एक पाय, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व,या मृत्यू आल्यास,त्याला आपल्या संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या माध्यमातून आर्थिक मदत झाली पाहिजे असा निर्णय घेतला व द न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी सोबत चर्चा करून चालकाला एका वर्षांच्या कालावधीचा एकशे पन्नास रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा करून देण्याचे ठरवले.तसेच संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे आय कार्ड प्रत्येक चालकाला देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र राज्यात व बाहेर,रात्रीबेरात्री कोणतीही समस्यां निर्माण झाली तर संघटना आवर्जून सहकार्य करते,एवढे मात्र निश्चित…विमा हा चालकांना आधार ठरणारा असून,महाराष्ट्र राज्यातील संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे ३ लाख चालक विमा उतरविणार असल्याचे पुढे आले आहे.