रेती अभावी घरकुल बांधकामे रखडली

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
घरकुल बांधकामासाठी अतिआवश्यक असलेली रेतीच उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकामे कशी पूर्ण करावी हा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे.
सध्या स्थितीत देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचा तुटवडा नव्याने व यापूर्वी घरकुल अपुर्णावस्थेत असलेल्या लाभार्थींना जाणवत आहे.तालुक्यात सध्या आवास सप्ताह दिनाची अंमलबजावणी सुरू असून, रमाई व प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत नव्याने घरकुल बांधकामांचे भूमिपूजन केले जातआहे.
ज्याप्रमाणे घरकुल बांधकामासाठी विटा,सिमेंट,लोहा व इतर साहित्यांची आवश्यकता असते तितकीच गरज रेतीची भासते.घरकुल बांधकाम केले नाही तर ‘म्हणे’ग्रामपंचायत दाखले मिळणार नाही,तर मग रेती उपलब्ध करून द्यायला हवी असे घरकुल लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.कित्तेक घरकुले एक ते दोन वर्षांपासून रकमे अभावी व रेती अभावी अपुर्ण आहेत.पूर्ण होण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे.