तक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घरफोडी :साडेचार लाखांचा ऐवज लंपास

सागर जगदाळे/इंदापूर तालुका सहाय्यक प्रतिनिधी
भिगवण: आज तक्रारवाडी गावामध्ये भरदिवसा घराचे कडी-कोयंडे तोडून साधारणपणे साडेचार लाखांचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला तक्रारवाडी गावामध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तक्रारवाडी मध्ये आज विवाह समारंभ होता व या विवाह समारंभासाठी वराच्या शेजारी राहणारे बायडाबाई मोरे व दिनेश वाळके त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य लग्नसमारंभासाठी गेले होते व याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी साधारणपणे साडे बाराच्या आसपास बायडाबाई मोरे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील चार तोळे दागिने व दिनेश वाळके यांच्या घरातील एक सोन्याची अंगठी व रोख पाच हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली
तक्रारवाडी गावामध्ये दिवसाढवळ्या चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी भिगवन पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी चोरांना लवकर पकडावे अशी मागणी तक्रारवाडी ग्रामस्थांनी केली आहे