वैरागड – देलनवाडी मानापूर रस्त्याची दुर्दशा

अनिलकुमार एन.ठवरे
ग्रामिण तालुका प्रतिनिधी आरमोरी
देलनवाडी :- आरमोरी तालुक्यामध्ये वैरागड -देलनवाडी मानापूर हा मुख्य रहदारीचा रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे.या रस्त्याने बरेचसे खेडेगाव तसेच महत्वाचे गाव सुद्धा जोडलेले आहेत.परंतु मोहझरी बसस्टँड ते शिवणी (खुर्द) नाला तसेच नागरवाही समोर असलेले नागदेव – देलनवाडी मानापुर ते मांगदा हा रस्ता पूर्णता उखडलेला आहे.
अगदरोच वरील ठिकाण हे अपघात प्रवण स्थळ म्हणून प्रसिध्द आहेत,त्यातच रस्त्यावर खाच-खळगे पडलेले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे.संबंधित विभागाने याची दक्षता घेऊन त्वरित रस्ता दुरूस्ती करावी अशी रहदाऱ्या कडून रास्त मागणी होत आहे.