भाजप,रयत,रिपाइं,बळीराजा,शिवसंग्राम, किसान क्रांती मोर्चा.

110

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

दुधाच्या संघर्षात रासप च्या सोबत महायुती मैदानात उतरली आहे.
माजी दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून राष्ट्रीय समाज पक्षाने दुधदरवाढ करण्यासाठी लेखी निवेदन देऊन, विठ्ठल मुर्तीला दुग्धाभिषेक घालून वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन उभे केले आहे.
दि.२० रोजी पंढरपूर येथे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार साहेब आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकार्यांना प्रांताधिकारी साहेब आणि तहसिलदार मॅडम पंढरपूर यांच्यामार्फत दुधपिशवी पाठवुन आंदोलन करण्यात आले.
येत्या आठवड्यात दुधाला १० रु.प्रति लिटर आणि दुधभुकटीला ५० रु.प्रति किलो अनुदान द्यावं अन्यथा दि.०१ आॅगस्ट रोजी आम्ही सर्व पक्ष संघटना राज्यव्यापी दुधदर एल्गार आंदोलन करणार आहोत असे मत रासपचे पंकज देवकते यांनी यावेळी मांडले.
यावेळी रयतचे दिपकजी भोसले, रिपाइंचे किर्तीपाल सर्वगोड,बळीराजाचे माऊली हळणवर,प्रा.सुभाष मस्के,रासपचे संजय लवटे,महाळाप्पा खांडेकर भाजपचे दशरथ काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.