बाबा आमटे यांच्या नातिनीने विषारी इंजेक्शन लाऊन केली आत्महत्या

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक दखल न्युज भारत

चंद्रपुर : ३० नोव्हेंबर २०२०
कुष्ठरोग सेवी व वन्यप्रेमी बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या सौ. शितल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
डॉ. शितल आमटे यांनी आपल्या खोलीत विषारी इंजेक्शन हाताला टोचून घेतल्यानंतर त्यांनी उलटी केली होती. ही बाब लक्षात येताच त्यांचे पती गौतम यांनी व सासरे यांनी रुग्णवाहिका बोलाऊन उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना म्रृत घोषित केले. डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या संशयास्पद आहे त्यांच्या आत्महत्येच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले असल्याची माहिती आहे. जिल्हा अधिक्षक साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन डॉ. शितल आमटे यांचा म्रृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला. फाँरेंसिक लैब मध्ये त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शीतल यांनी सोशल मीडियावर एक चित्रफित जारी करून आनंदवनातील कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्यांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ही चित्रफित हटवण्यात आली होती.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी केलेल्या एका ट्वीट मध्ये War and Peace असे कॅप्शन देऊन अक्रेलिक कॅन्व्हॉसवर रेखाटलेले एक रेखाचित्र शेअर केले आहे.