अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा स्वातंत्र ग्राम पंचायत निर्माण करा स्वाभिमान ग्राम विकास संघटनेच्या वतीने निवेदनातून मागणी

112

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

 

अहेरी :- शिक्षक मतदार संघ नागपुर विभागाचे उमेदवार ऍड अभिजित वंजारी यांच्या प्रचार सभेत उपस्थित राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली दौ-यावर आलापल्ली येथे आले असता अहेरी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठे असलेले गाव छल्लेवाडा.
सदर छल्लेवाडा गाव रेपणपली ग्राम पंचायत मध्ये समाविष्ट असून गावात ग्रामपंचायत नसल्याने प्रशासकीय कामासाठी गावातील वृध्द , विद्यार्थी व शासकीय कामे यासाठी रेपनपल्ली येथे पायपिट करावी लागते.वेळोवेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे गावाचा विकास आजही खुंटलेला आहे.त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावाच्या समस्या सोडविण्यासाठी रेपणपली ग्राम पंचायत मधून विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करा अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी अजयभाऊ कंकडालवार जि.प.अध्यक्ष गडचिरोली, भास्कर तलांडी पं.स.सभापती अहेरी यांचे समक्ष विजयभाऊ वडेट्टीवार पुनर्वशन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे निवेदन सादर केले. महोदयांनी स्वतंत्र ग्रामपंचायत तात्काळ निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी स्वाभिमान ग्राम विकास संघटना छल्लेवाडाचे अध्यक्ष अनिल बापू रत्नम, उपाध्यक्ष संतोष गणपती निकुरे ,सचिव अजित नारायण भसारकर , मोहनलाल चापले, पुजा देवगडे, स्वामी जनगम, अनुप्रिया भसारकर, मनिषा ताटीवार, लक्ष्मी गुरनुले, रेखा दुर्गे, महेश मुद्दमवार, आदी गावकरी उपस्थित होते.