प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार व कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात मिळणार मोफत उपचार !

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई (लातूर), दि.३० : ‘कोविड-१९’ विषाणूंचा फैलाव महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात थैमान घातल्याने गेल्या १० महिन्यांपासून पत्रकारांपुढे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. महाराष्ट्रात आर्थिक अडचणीमुळे ‘कोविड-१९’ या आजाराने अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला आणि कुटुंब पोरके झाले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून संघाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ असे एक वर्ष ‘कोविड -१९’ विषाणूवरील उपचार त्याचप्रमाणे सांधे व मणक्याच्या आजारावरील उपचार, ॲक्सिडेंट व फ्रॅक्चर, संधीवात, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, सर्पदंश व विषबाधा, कॅन्सर, एच.आय.व्ही., टी.बी., छातीचे विकारांचे निदान व उपचार, एक्सरे, इ.सी.जी., पॅरासिस, मुळव्याध, किडणीचे विकार व उपचार, महिलांचे विविध आजार, पोटाचे विकार, लहान मुलांचे सर्व विकार, सर्दी, ताप, खोकला, मलेरिया व किरकोळ आजार अशा सर्व आजारांवर मोफत उपचार करून दिले जाणार असून काही आजारांवर सवलतीत उपचार मिळणार आहेत. यानंतर टप्याटप्याने संघाच्या महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना खाजगी रूग्णालयात मोफत उपचार करून दिले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी सांगितले.

खाजगी रूग्णालयात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत उपचार करून देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा समन्वयक सुनिल बरूरे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.