भाजपा खा. रामदास तडस यांच्या वंजारी कुटुंबियावरील वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : ३० नोव्हेंबर २०२०.
नागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा ने निषेध केला आहे.
यरविवारी एका प्रसार माध्यमाच्या वृत्तातुन खासदार तडस यांनी अशी गंभीर टिका केली त्यांचा या टीकेमुळे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार तडस, आपण वंजारी परिवारावर या निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात टीका , आरोप केलेत तेही निवडणूकी च्या रिंगणात प्रथम क्रमांकावर असनाऱ्या एका तेली समाजाच्या उमेदवारावर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष या नात्याने असे वक्तव्य आपल्याला अशोभनिय आहे”. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा चे नागपुर शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर यांनी म्हटले रामदास तडस यांना त्यांच्या निवडणुकीत समाज बांधवांनी मदत केली आणि ते खासदार झाले, पण आता त्यांना आपल्या पक्षाची काळजी आहे, समाज बांधवांची काळजी नाही म्हणून त्यांनी जे अभिजित वंजारी यांचे बद्दल निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात आपल्या समाज बाधंवाची बदनामी केली आणि काही सामाजाचे काम नाही होत म्हणुन त्यांनी आपल्या पक्षाचे काम करावं समाजाचे नाही आम्ही या टीपणी चे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपुर च्या वतीने निषेध करतो.असेही न्यायखोर यांनी म्हटले आहे.
तसेच इतर समाजबांधवानी सुद्धा खासदार तडस यांच्या वक्तव्याचे निषेध केले आहे त्यामध्ये कृष्णराव हिंगणकर महाराष्ट्र प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, सुखदेव वंजारी प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी, योगेश न्यायखोर नागपूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, आदित्य पंधरे विभागी अध्यक्ष पूर्व विदर्भ युवक आघाडी, सुरज फंदी नागपूर शहर अध्यक्ष युवक आघाडी, निलेश तिघरे अध्यक्ष उत्तर नागपूर विभाग युवक आघाडी, पंकज कुंभलकर अध्यक्ष मध्य नागपूर विभाग युवक आघाडी, विजय साहु अध्यक्ष पूर्व नागपूर, गौरव गुप्ता (शाहू)अध्यक्ष पूर्व नागपुर युवक अघाड़ी तसेच समस्त प्रदेश पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी यांनी खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.