नागपूर पदवीधर मतदार संघातर्गत परिवर्तन पॅनेलचे उमेदवार अतुल खोब्रागडे यांनी मात्तबर उमेदवारांची उडविली झोप. — पदवीधर मतदारावर केली पकड मजबूत.. — एका जबाबदार शिक्षकांचा मुलगा लढतोय निवडणूक..

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नागपूर पदवीधर मतदार संघातंर्गत परिवर्तनाची अपेक्षा आहे,पदवीधर मतदारांनी मनावर घेतले तर “पदवीधर मतदार,नागपूर पदवीधर मतदार संघात अनेक मात्तबरांचे राजकीय गणिते चुकवून स्वत:च्या हक्काचा व आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आणू शकतात एवढी ताकद त्यांच्यात आहे.
परिवर्तन पॅनलने एका होतकरू व जबाबदार तरुणाला नागपूर पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.अतुलकुमार दादा खोब्रागडे असे सदर तरुण व जबाबदार उमेदवारांचे नाव आहे.
अतूल कुमार खोब्रागडे यांनी नागपूर पदवीधर मतदार क्षेत्रातंर्गत पदवीधर मतदारांवर आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे छाप सोडली असून,पदवीधर मतदारांवर त्यांच्या हितसंबंधाने असलेल्या,अतुल कुमार खोब्रागडे यांच्या शपथपत्राचा प्रभावी परिणाम पडला आहे.
अतुल कुमार खोब्रागडे हे एका जबाबदार व शिस्तप्रिय,जानकार,शिक्षकांचे चिरंजीव असून,ते सुद्धा अनुभवाने कणखर आहेत.यामुळे परिवर्तन पॅनेलचे उमेदवार अतुल कुमार खोब्रागडे हे पदवीधर मतदार संघातील,पदवीधर मतदारांत प्रिय ठरत आहेत व तरुण मतदारांवर त्यांच्या मजबूत विचारांचा परिणाम कारक प्रभाव दिसून येतो आहे.