नागपूर पदवीधर मतदार संघातून वंचितच्या उमेदवाराला बहुमताने निवडून देणे काळाची गरज..माजी राज्यमंत्री डाॅ.रमेशकुमार गजबे,भगवान भोंड..

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
प्रस्थापित परंपरावादी पक्षाच्या उमेदवारांना आजपर्यंत बहुजन समाजातील पदवीधर मतदारांनी नागपूर पदवीधर मतदार संघातून निवडून दिले आहे.परंतू आजातागायत भाजपाच्या पदवीधर आमदारांनी,पदवीधरांसाठी कुठल्याही प्रकारचे कार्य केले नाही किंवा बहुजन समाजातील पदवीधर युवकांना रोजगारात व नौकरीत अग्रगण्य प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही.म्हणूनच नागपूर पदवीधर मतदार संघातून बहुजन समाजातील,पदवीधर मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्राधान्याने निवडून देणे आवश्यक आहे असे मत,वंचितचे विदर्भ प्रमुख माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे व विदर्भ सदस्य भगवान भोंड यांनी व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन समाजाने स्वत:चे नेतृत्व स्वत: करणे शिकले पाहिजे व स्वत:च्या नेतृत्त्वासाठी स्वत: खंबीर पणे पुढे आले पाहिजे.मागचे नेतृत्व करुन फक्त मागणे हेच आमचे ध्येय किंवा आमचा उद्देश असता कामा नये तर आपण आता देणारे बनलो पाहिजे,असी वैचारिक मानसिकता,पदवीधर मतदार युवकांनी तयार केली पाहिजे असे मत सुध्दा बऱ्याच पदवीधर मतदार युवकांची आहेत,असे स्पष्ट दिसते आहे.

म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्राधान्य क्रम देत,बहुजन समाजातील पदवीधर मतदारांनी,वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून देणे आपले कर्तव्य समजले पाहिजे व बहुजन समाजातील तरुण आपल्या अधिकार हक्कासाठी जागरूक व सतर्क झाले आहेत,हे दाखवून दिले पाहिजे,असाच हा काळ आहे.