नागपुर पदवीधर मतदारसंघात यावेळी परिवर्तन घडणार भाजपाचे संदीप जोशी यांच्या साठी गड राखणे कठीण ; तर कांग्रेसचे अभिजीत वंजारी आशावादी अपक्ष उमेदवार चमत्कार घडविण्याची शक्यता

1337

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक दखल न्युज भारत नागपुर

नागपुर :२९ नोव्हेंबर २०२०
विदर्भातील ६ जिल्हे मिळुन असलेल्या नागपुर पदवीधर मतदारसंघातील भाजपाचा गड राखणे यंदा भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना जड जाईल असे बोलले जात आहे. मागील ४० वर्षापासून या मतदारसंघात भाजपचे गंगाधर फडणवीस, नितीन गडकरी, अनिल सोले यांचे निर्विवाद वर्चस्व होते. परंतु यावेळची निवडणूक ही चमत्कारिक व परिवर्तन घडवणारी निवडणूक म्हणुन बघितली जाते. भाजपाचे संदीप जोशी यांच्या पुढे कांग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार *अँड. अभिजीत वंजारी* यांनी आव्हान उभे केले आहे. विविध शिक्षण संस्था शी समन्वय साधुन पदवीधरांपर्यंत अभिजीत वंजारी यांनी *परिवर्तन मिशन*सुरु केले आहे. कधी नव्हे ते तिन्ही पक्ष कांग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत भाजपाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे अँड. अभिजीत वंजारी हे आशावादी आहेत.

*अपक्ष उमेदवारांचा प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांना सोशल मीडिया तुन दणका*
कधी नव्हे तेवढी चुरस यंदा नागपुर पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार यांनी वाढवली आहे. भाजपा कांग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना कोंडीत पकडण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी अक्षरशः चंग बांधला असुन पदवीधरांसाठी राखीव मतदारसंघात *मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?* असा प्रश्‍न उपस्थित करीत पदवीधरांमध्ये पहिल्यांदा च जनजागृती करीत पदवीधरांना माहिती दिली की हा मतदारसंघ फक्तं पदवीधरांसाठी च आहे असे असताना प्रस्थापित राजकीय पक्षांनी आमच्या मतदारसंघात जबरदस्ती अतिक्रमण का केले? त्यामुळे पदवीधरांना आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व व महत्त्व कळाले आहे. एरव्ही या मतदारसंघातून भाजपा चे उमेदवार निवडून आलेत, परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व. गंगाधर फडणवीस प्रा. अनिल सोले यांनी पदवीधरांसाठी काहीच कार्य केले नाही. त्यांनी पदवीधरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पहिल्यांदा च भाजपा विरोधात शिक्षक, प्राध्यापक, अडव्होकेट व पदवीधर या सर्व वर्गातुन अपक्ष उमेदवार उभे ठाकले आणि भाजप चा खरा चेहरा पदवीधरांपर्यंत आणला. अपक्ष उमेदवार वंचित बहुजन आघाडी चे इंजि. राहुल वानखेडे, प्रा. विनोद राऊत(विदर्भ राष्ट्रवादी पदवीधर संघठना) , नितीन रोंघे(विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, बळीराजा पार्टी, जनसुराज्य पार्टी, समर्थित उमेदवार) , अँड. सुनिता ताई पाटील(,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व अंशकालीन पदवीधर मतदार संघठना), अँड. विरेंद्र जयस्वाल तसेच सोशल मीडिया मधील फेमस नितीश कराळे मास्तर यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी वर पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांवर पाच प्रश्न उभे करीत *तुमचे नेते राष्ट्रीय नेत्रृत्व म्हणुन वाढले ;पण पदवीधर हा वंचित च का राहिला?* असा प्रश्न उपस्थित केला. भाजपचे उमेदवार संदीप जोशी किंवा त्यांच्या स्टार प्रचारकांना सध्या बेरोजगार द्वारा विचारलेले पाच कार्य सांगणे कठिण जात आहे. भाजपचे उमेदवार साठी सहा जिल्ह्य़ातील संपुर्ण खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक जि. प सदस्य अशी सर्व टीम कामास लागली. पहिल्यांदाच भाजपा ला घाम फुटला आहे. भाजप नेते व स्टार प्रचारक हे महाविकास आघाडी च्या एक वर्षाच्या कारकिर्दीवर आरोप करीत मते मागत आहेत. परंतु पदवीधरांच्या प्रलंबित समस्यांवर मुग गिळून गप्प बसले आहेत.

संदीप जोशींना तिकिट देऊन भाजपा ने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला?
भाजपा ने सातत्याने १९८० पासून नेहमी एका विशिष्ट जातीच्या म्हणजेच ५% लोकसंख्या असलेल्या (ब्राम्हण) प्रतिनिधी ला च प्राधान्य दिले असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. १९८० पासून नितीन गडकरी, गंगाधर फडणवीस (देवेंद्र फडणवीस यांचे वडील) आणि प्रा. अनिल सोले यांना तिकिट दिली. यावेळी पुन्हा नागपुर चे महापौर संदीप जोशी यांना तिकिट देऊन पदवीधरांपुढे विरोधी उमेदवार यांनी संदीप जोशी यांच्या जातीचा प्रश्न उपस्थित करीत वारंवार ब्राम्हण उमेदवाराला च प्रतिनिधित्व का? काय भाजपा मध्ये ओबीसी, एस सी, एस टी, मुस्लिम पदवीधर उमेदवार नव्हते का? काय भाजपा मध्ये ब्राम्हणांना वर्चस्व आणि इतरांना फक्तं लाँलीपाँप गाजर का दाखवले जाते? आपल्या हाती ब्राम्हणांना सत्ता ठेवावी असे आरएसएस ला वाटते का? असे ही या मतदारसंघात प्रचारादरम्यान हे मुद्दे गाजत आहेत. तर दुसरीकडे महापौर संदीप जोशी यांनी कोरोना काळात नागपूर मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या बदलीसाठी दिल्ली वारी करीत दबाव आणला आणि एका ईमानदार अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली केवळ राजकीय स्वार्थासाठी सुडबुद्धी ने संदीप जोशी यांनी घडवली व आज कोरोना चे भयावह संकट नागपूर मध्ये वाढले. कोरोना काळात महापौर यांनी नागपूर ला मरणाच्या दारी सोडले आणि ते पदवीधर मतदारसंघात आपला प्रचार करीत हिंडत आहेत. मग नागपुर मनपा चा कारभार मागील २ महिन्यापासून कोण चालवत आहे असा प्रश्‍न उभा राहिला आहे.
त्यामुळे सध्या नागपुर पदवीधर मतदारसंघ भाजपा चे संदीप जोशी राखणार की ते पडणार हे आता पदवीधर सुज्ञ पदवीधर मतदार ठरवणार आहेत. कोरोना काळात नागपुर च्या युवकांत विलन ठरलेले संदीप जोशी जर निवडुन आले तर हा चमत्कार समजु. आणि त्यांना सुखद धक्का देत जर कांग्रेसचे अभिजीत वंजारी निवडुन आल्यास त्यांचे *मिशन परिवर्तन* यशस्वी होईल.
….. अन्यथा प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांना धक्का देत एखादा अपक्ष उमेदवार जोरदार मुसंडी मारत निवडुन येईल हे आताच सांगणे कठीण आहे. १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक असुन ३ डिसेंबर २०२० रोजी निकाल आहे. सध्या विदर्भातील नागपूर,भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्य़ातील पदवीधर काय निर्णय घेतात? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षांना निवडणुक लढविण्यांवर बंदी आणण्यासाठी कोर्टात जाणार
पदवीधर आणि शिक्षक यांच्या समस्या व विकास व्हावा त्यांच्या न्यायहक्काच्या मागण्या विधानपरिषद च्या सभागृहात मांडणारा त्यांचा एक एक प्रतिनिधी हवा याकरिता संविधानाने तरतुद केली आहे. मात्र पदवीधर व शिक्षक मतदार संघात कांग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना यासारख्या राजकीय पक्षांनी जबरदस्ती राजकीय अतिक्रमण करीत पदवीधर व शिक्षक मतदारांवर आपले प्रेशर बनवले आहे. पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीत कोणत्याही राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह नसते. फक्तं उमेदवारांच्या नावापुढे क्रमांक १ लिहुन त्यांना आपल्या पहिल्या पसंतीचे मत द्यावे लागते. मग राष्ट्रीय पक्षांनी या मतदारसंघास राजकीय आखाडा का बनवावा यासाठी आज पहिल्यांदाच अपक्ष व सुशिक्षित उच्चविद्याविभूषित उमेदवारांनी एकत्र येत राजकीय पक्षांवर आपला हल्ला चढविला आहे. त्यांच्या मते विधानसभा निवडणुकीत या राजकीय पक्षांनी जनतेच्या रिंगणात उतरावे.. शिक्षक व पदवीधर मतदारसंघात या राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी मज्जाव करावा यासाठी लवकरच जनजागृती करीत कोर्टात जाणार असेही या अपक्ष उमेदवारांनी दखल न्युज भारत चैनल शी बोलतांना सांगितले. कला, साहित्य, समाजसेवा सहकार या क्षेत्रातुन राज्यपाल महोदय यांना १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे परंतु मागील ५० वर्षात प्रत्येक सरकार ने आपले संख्याबळ वाढविण्याच्या दृष्टीने या सर्व क्षेत्रात आपल्या राजकीय पक्षांचे उमेदवार वाढवून जबरदस्ती कब्जा केला आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांना शिक्षक, पदवीधर, कला, सहकार, साहित्य या क्षेत्रातुन उमेदवार देण्यासाठी बंदी आणण्याच्या दृष्टीने विविध सामाजिक संघटना, फ्रंट कोर्टात जाणार आहेत हे मात्र नक्की….