वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर रेती तस्करांनि जमा केला हजाराे ब्रास रेती साठा महसूल खाते मात्र गाढ झोपेत

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

नकोडा येथून जवळच्या वर्धा नदी च्या चिंचोली घाटावर रेती तस्करांनी हजाराे ब्रास रेती साठा साठवुन ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीतून रोज हजारो ब्रास रेती चोरी करून त्या रेतीला साठवुन मध्य रात्री हायवा गाडीने अन्य जिल्ह्यात *35 ते 40 हजार* रुपये प्रति हायवा किमतीच्या दरात रेती विकल्या जात असुन रेती तस्कर रेती विकुन मालामाल हाेतांना दिसतात . मात्र घुग्घुस येथील पटवारी दिलीप पिल्लई तसेच मंडल अधिकारी किशाेर नवले मुख्य ठीकानी उपस्थीत असूनही या कडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत.
हजारो ब्रास रेती
माफियानी जमा करून नदीपात्रात ठेवली आहे, अधिका-यांचा संगनमताने च रेती चोरी सुरू आहे असे संपूर्ण परिसरात बाेलल्या जात आहे. या सर्व प्रकारामुळे कोट्यावधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडत असल्यांने शासनाला आर्थिक नुकसानाला समाेर जावे लागत असुन, एकीकडे मात्र रेती तस्करांची मुजोरी दिवसेन दिवस वाढत आहे. त्या परिसरात फेरफटका मारल्यास पटवारी दिलीप पिल्लई, व मंडल अधिकारी, किशोर नवले, हे रेती तस्करांचा दुचाकी वाहन क्र, *MH34 BN – 3826* वाहनाने फिरत असतांना आढळले. कसलीही कारवाही न करता आम्ही काही तरी करताे हे दाखवण्या करिता पाेकलेंड मशिन द्वारे रेती तस्करांनी रेतीची चाेरी करू नये म्हणून चोरीच्या मुख्य मार्गावर २० फुट माेठ्या स्वरूपातील खड्डे करण्यात येत आहे. परंतु तस्करांना रोखण्या करिता किती ही उपाय याेजना केल्या तरी अधिकाऱ्यांच्याच आशिर्वादाने रेती तस्कराचे मनाेबल वाढत असुन राेज घाटा वरिल रेती माफिया रेती ची तस्करी करत असल्याचे शहरात दबक्या आवाजात चर्चेला उत आला आहे. असे असुन सुद्धा प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत दिसुन येत आहे . या सर्व बाबीची सखाेल चाेैकशी करून तात्काळ दाेषी अघिकारी व रेती तस्करांवर कारवाही व्हावी अशी जनतेची मागणी आहे.