स्वाभिमान ग्राम विकास संघटना छल्लेवाडा यांची स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी मंत्रीमहोदयांकडे मागणी.

0
231

 

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(बातम्या व जाहिराती करीता मो.8275228020)
(गडचिरोली जिल्हा)

आलापल्ली :-
२९ नोव्हेंबर रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार हे गडचिरोली दौ-यार्तंगत आलापल्ली येथे आले असता अहेरी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठे गाव असलेले छल्लेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. सदर गाव हे रेपनपल्ली गटग्रापंचायतमध्ये असून ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी गावातील वृध्द , विद्यार्थी व शासकीय कामे यासाठी रेपनपल्ली येथे पायपिट करावी लागते. वेळोवेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे गावाचा विकास आजही खुंटलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता ग्रंथात सांगतात गावखेडयांच्या विकासामधेच देशाच्या विकासाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व गावाच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रीमहोद्यांकडे स्वतंत्र ग्रामपंचायतकरीता निवेदन सादर करण्यात आले.
त्यावेळी मा.अजयभाऊ कंकडालवार जि.प.अध्यक्ष गडचिरोली, मा.भास्कर तलांडी पं.स.सभापती अहेरी यांचे समक्ष मा.विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले. महोदयांनी स्वतंत्र ग्रामपंचायत तात्काळ निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी स्वाभिमान ग्राम विकास संघटना छल्लेवाडाचे अनिल बापू रत्नम (अध्यक्ष), संतोष गणपती निकुरे (उपाध्यक्ष), अजित नारायण भसारकर (सचिव), मोहनलाल चापले, पुजा देवगडे, स्वामी जनगम, अनुप्रिया भसारकर, मनिषा ताटीवार, लक्ष्मी गुरनुले, रेखा दुर्गे, महेश मुद्दमवार तथा बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.