अल्पवयीन मुलावर जंगली रानडुकराचा हल्ला, शेतकऱ्याने दगड फेकुन मारल्याने प्राण वाचले, शिंदी बु गावातील घटना

0
210

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
आपल्या वडिलांसोबत जाऊन गुरांना चारा घेऊन परत येत असताना एका अल्पवयीन मुलावर जंगली रानडुकराने हल्ला करुन त्याला जखमी केले तेथील एका शेतकऱ्याने दगड फेकून मारल्याने त्या मुलाचे प्राण वाचले
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु येथे हि घटना दि 29 नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली कृष्णा दिलीप माहुरे वय 13 असे जखमी मुलाचे नाव असुन तो आपल्या वडिलांसोबत शेतात गेला होता घरच्या पाळीव जनावारांसाठी डोक्यावर चारा घेऊन परत येत असताना गावाजवळ लहाने यांच्या शेतातील टावरजवळ एका डबक्यात जंगली रानडुकर लोळत होते कृष्णा डोक्यावर चारा घेऊन जात असताना त्या रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला केला त्याच्या डोक्याला, मांडीला, पोटाला व कमरेला चावा घेऊन जखमी केले सोमेश्वर लहाने या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहताच त्यांनी न घाबरता कृष्णाचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी जंगली रानडुकराला दगड मारले त्यात जंगली रानडुकर पळून गेले
जखमी अवस्थेत त्या मुलाला घरी आणण्यात आले व रूग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे नेण्यात आले या घटनेमुळे शिंदी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे