आयुष्यावर बोलू काही…….. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पी. डी. एज्युकेशन आरमोरी येथे मोठ्या ऊत्साहात संपन्न.

 

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(बातम्या व जाहिराती करीता मो.8275228020)
(गडचिरोली जिल्हा)

 

आरमोरी : –
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 28 नोव्हेंबर स्मृती दिनानिमित्त दि. 29 नोव्हें. रोजी पी. डी. एज्युकेशनला मा. रेणुका निकुरे (कर सहाय्यक) यांचा आयुष्यावर बोलू काही……. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. सुनील राऊत उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पी. डी. एज्युकेशनचे सहकारी मा. मिथुन शेबे सर (शेबे फिजिकल अकॅडमी), मा. शंकरराव राऊत (योग शिक्षक), प्रा. मोहन रामटेके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण पी. डी. एज्युकेशनचे संचालक दिनेश देशमुख सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास भेंडारे याने केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कु. ब्राजल गडपायले हिने केले.
अहेरी तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातून बाहेर पडून अधिकारी बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास मुलाखतीतून रेणुकाताईंनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
तसेच पी. डी. एज्युकेशन राबवित असलेल्या गडचिरोली / चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी कुटुंबातील व बहुजन समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत फिजिकलचे मार्गदर्शन या उपक्रमाचे कौतुक केले.